चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी, महिला शिक्षकही सहभागी

चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी झोडली तीही शाळेला सुट्टी देऊन. या पार्टीत महिला शिक्षकही सहभागी होत्या. याप्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

Updated: Apr 17, 2015, 12:24 PM IST
चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी, महिला शिक्षकही सहभागी title=

गोंदिया : चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी झोडली तीही शाळेला सुट्टी देऊन. या पार्टीत महिला शिक्षकही सहभागी होत्या. याप्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

एरवी विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक सध्या पार्टीमध्ये मशगुल होताना दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील तीरखेडी गावात केंद्र संमेलनाच्या नावावर शाळेला लवकर सुट्टी देऊन तब्बल २२ ते २५ शिक्षकांनी भर दिवसा मटण आणि दारू पार्टी आयोजित केली होती. 

विशेष म्हणजे या पार्टीत महिला शिक्षकांनी देखील भाग घेतला होता. पार्टीचा आस्वाद घेत असताना 'झी मिडिया'चा कॅमेरा बघताच यातील काही शिक्षकांनी पळ काढला. या सर्व प्रकाराबाबत लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन गट शिक्षणाधिका-यांनी दिलं आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.