सातऱ्यातील कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रातील आणि कराडमधील रहिवासी असलेला कुप्रसिध्द गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या मृत्यू झाला 

Updated: Dec 23, 2015, 03:37 PM IST
सातऱ्यातील कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू   title=

पुणे :  पश्चिम महाराष्ट्रातील आणि कराडमधील रहिवासी असलेला कुप्रसिध्द गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या याचा पुण्यातील ससून रूग्णालयात मृत्यू झाला. 
 
 सल्या चेप्या हा महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्यातील मुख्य संशयित आरोपी होता. तसंच सल्यावर खून, खंडणी, मारामारी असे १८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे सातारा आणि सांगली जिल्ह्यात दाखल झालेले होते. अशाच एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सल्यावर कराड कोर्टात गोळीबार झाला होता. 
 
 त्यात सल्याचा पाठीचा कणा पुर्ण निकामी झाला होता. एवढं होऊनही सल्याची गुन्हेगारी कृत्य सुरूच होती. काही महिन्यांपुर्वी कराडात बबलू माने खून प्रकरणात सल्या प्रमुख सुत्रधार असल्याच्या संशयावरुन पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. 
 
 त्यानंतर सातारा पोलीसांनी सल्यावर नुकतीच मोक्कातंर्गत कारवाई केली होती. या सुनावणी दरम्यान सल्याला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या उपचारादरम्यान सल्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.