मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अखेर पहिली अटक केली आहे. हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता विरेंद्र तावडे याला सीबीआयने अटक केलीय. विरेंद्र तावडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता त्याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणावरून आता सनातन संस्थेनं कांगावा करायला सुरुवात केली आहे. हिंदू सरकार सत्तेत येऊनही हिंदूंवरचे अत्याचार कमी झालेले नाहीत असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. सीबीआयकडे कोणतेही पुरावे नसताना फक्त सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी वीरेंद्र तावडेला अटक केल्याचंही अभय वर्तक म्हणाले आहेत.