एस. टी. बस नाल्‍यात कोसळून 6 ते 7 प्रवासी जखमी

 गोवा महामार्गावर डोलवी गावानजीक आज दुपारी साडेतीन वाजण्‍याच्‍या सुमारास मुंबईहून रत्‍नागिरीकडे निघालेली एस. टी. बस नाल्‍यात कलंडून 6 ते 7 प्रवासी जखमी झाले.

Updated: Jun 27, 2016, 08:15 PM IST
एस. टी. बस नाल्‍यात कोसळून 6 ते 7 प्रवासी जखमी  title=

मुंबई :  गोवा महामार्गावर डोलवी गावानजीक आज दुपारी साडेतीन वाजण्‍याच्‍या सुमारास मुंबईहून रत्‍नागिरीकडे निघालेली एस. टी. बस नाल्‍यात कलंडून 6 ते 7 प्रवासी जखमी झाले.

एस. टी. बसचे स्‍टेअरींग लॉक झाल्‍याने बस रस्‍त्‍यालगत असलेल्‍या रेल्‍वेच्‍या नाल्‍यात कोसळून हा अपघात झाला . सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही. वडखळ पोलीसांनी तातडीने अपघातस्‍थळी धाव घेवून अपघातग्रस्‍त बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. 

अपघात होवून बराचवेळ झाला तरी एस. टी. चा एकही अधिकारी तिकडे फिरकला नसल्‍याचे स्‍थानिकांनी सांगितले .