शिवसेनेचे कान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टोचले

पाकिस्तान विरोधावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिवसेनेचे कान टोचलेत. संकुचीत मानसिकतेमधून देशानं आता बाहेर पडालया हवं असं संघाचे सरकार्यवाहक सुरेश सदाशिव ऊर्फ भैय्याजी जोशींनी म्हटलंय. 

Updated: Oct 22, 2015, 09:59 AM IST
शिवसेनेचे कान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टोचले title=

नागपूर : पाकिस्तान विरोधावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिवसेनेचे कान टोचलेत. संकुचीत मानसिकतेमधून देशानं आता बाहेर पडालया हवं असं संघाचे सरकार्यवाहक सुरेश सदाशिव ऊर्फ भैय्याजी जोशींनी म्हटलंय. 

दादरीसारख्या घटनांचं कधीही समर्थन केलं जाणार नाही असंही ते म्हणालेत. जो गुन्हा आहे तो गुन्हाच आहे असं म्हणत त्यंनी दादरी सारख्या घटनांचं कधीही समर्थन केलं जाणार नाही हे स्पष्ट केलं. हिंसेचा मार्ग संघाला कदापी मान्य नाही असंही ते म्हणाले. साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्यामागे राजकारण असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या 'गर्विष्ठ' पोस्टरबाजीवर भाजप नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही सहन करतोय, योग्यवेळी निर्णय घेऊ. आता आम्ही मोठा भाऊ आहे, असे बापट म्हणालेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच पाकिस्तानविरोधातील आंदोलनाची धार शिवसेनेने जोरदार लावल्याने मित्र पक्ष भाजपने शिवसेनेवर तोंडसुख घेण्याचा धडाका लावलाय. याला  शिवसेनेने आपल्या भाषेत उत्तर दिलेय. ज्यांची लायकी नाही, त्यांनी आम्हाला गोष्टी शिकवू नये, असाच इशारा दिलाय. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत असल्याने भाजप-शिवसेनेत वाद टोकाला जाण्याची शक्यता असताना आता संघाने कान टोकल्याने त्यात भर पडली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.