धुळे : धुळे पोलीस श्वान पथकातील रॉकी नावाच्या कुत्र्याने राजू जाधव या पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केलाय.
या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जेवणाची डिश बदलून दिली म्हणून रॉकीने हा हल्ला केला असल्याचे त्याचा सांभाळ करणाऱ्या पोलीस कर्मचारी काझी यांनी सांगितले आहे.
'रॉकी' हा धुळे पोलिसांचा कर्तबगार श्वान असला तरी त्याचा पूर्व इतिहास हा हिंसक राहिला असल्याने त्याला पोलीस दलातून काढण्यात यावे, अशी मागणी जखमी पोलीस कर्मचारी जाधव यांनी केली आहे.
वेळीच जाधव यांना रोकीच्या तावडीतून सोडविण्यात आल्याने जाधव यांचा जीव वाचवता आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.