रत्नागिरी: रत्नागिरीत चार जणाच्या टोळक्यानं रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. आज रत्नागिरी शहराच्या बाजारातील विविध दुकान आणि शोरूममध्ये या चार जणाच्या टोळीनं बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपयांची खरेदी केली.
या टोळीनं रत्नागिरीच्या सॅमसंगच्या शोरूममध्ये सॅमसंगकंपनीचे चार मोबाईल खरेदी केले त्यांची किमत १ लाख ५६ हजार रुपये इतकी होती. या आरोपींनी इथं कार्ड वापरलं. यानंतर हे आरोपी इथून फरार झाले आणि पुढील काही मिनीटात बँकेकडून हा अपहार असल्याचा फोन सॅमसंगच्या शोरूमला आला. मात्र तोपर्यंत आरोपी पांढऱ्या रंगाच्या अलिशान कारमधून फरार झाले होते.
या टोळक्यानं रत्नागिरी शहरात अशाच पद्धतीनं अपहार करण्याचा प्रत्यत्न केला होता. मात्र काही ठिकाणी कार्ड स्व्याप न झाल्यानं व्यवहार झाले नाहीत. आता रत्नागिरी पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत.
या टोळक्यानं रत्नागिरी शहरातील एक ज्वेलर्स लुटल्याचीही माहिती आलीय. या ज्वेलर्सच्या दुकानात या टोळक्यानं ६० हजार रुपयांचे दागिने खरेदी करून तिथंही कार्ड वापरलं. इथं या टोळक्याबरोबर महिला असल्याचंही समोर आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.