रेशन धान्य घोटाळा : १७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारा रेशन धान्य घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या सर्व संशयितांची १७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Updated: Nov 1, 2015, 11:02 PM IST
रेशन धान्य घोटाळा : १७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त  title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारा रेशन धान्य घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या सर्व संशयितांची १७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांच्या तोंडातील घास पळविणाऱ्या या टोळीने केलेल्या गुन्ह्याची गंभीर पार्श्वभूमी लक्षात घेता १ जून २०१५ रोजी मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

नाशिकच्या न्यायालयाने हे सर्व आरोपी हजार होत नसल्याने मुख्य सूत्रधार आरोपी घोरपडे बंधूंची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व अधिकार्यांची संपत्ती जप्त करण्याविषयी शासनाकडे अहवाला पाठविण्यात आला आहे. 

या घोटाळ्यात सिन्नर येथील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलसांनी ट्रक पकडला होता. आणि या गुन्ह्याचा तपास करत असताना संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मदन पवार, रमेश पाटणकर या पाच संशियीतावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.