बीडमध्ये महिलेवर बलात्कार केल्यानंतर हत्येचा प्रयत्न

 बीडमध्ये एका २५ वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Updated: Nov 7, 2015, 07:21 PM IST
बीडमध्ये महिलेवर बलात्कार केल्यानंतर हत्येचा प्रयत्न title=

बीड : बीडमध्ये एका २५ वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हिवरगव्हाण इथं ही महिला घरातून आपल्या शेताकडे निघाली होती. त्यावेळी नराधमानं या महिलेवर अत्याचार केले. त्यानंतर झाल्या प्रकाराची वाच्यता कुठे करु नये यासाठी या नराधमानं तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. तो एवढ्यावर न थांबता त्याने  तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्नही केलाय.

घटनेनंतर नराधम फरार झालाय. दरम्यान, फिर्यादी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी फिर्यादीलाच अरेरावीची भाषा वापरली. या महिलेला जखमी अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तिची प्रकृती गंभीर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.