विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : संकटात असलेल्या आणि त्याच्या मदतीला धावून येणा-यास कसलाही जात, धर्म नसतो.. याचाच प्रत्यय औरंगाबादेत पाहायला मिळाला.. जगाचा निरोप घेताना एका रामने एका अब्दुलला जीवदान दिले आणि ख-या अर्थान अब्दुलला राम पावला..
नाना पाटेकर यांनी क्रांतीवीरमध्ये उपस्थित केलेला ये हिंदू का खून और ये मुसलमान का खून... बता इसमें से हिंदू का कौनसा... और मुसलमान का कौनसा... सवाल विचारण्याची गरज संपवणारी एक घटना औरंगाबादमध्ये घडली...
साठीत असणारे हे आहेत अब्दुल गणी.. गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या विकारानं बेजार झाले होते.. कुणी किडनी दाताही नसल्यानं त्यांचं आयुष्यच संकटात सापडलं होतं.. मात्र या अब्दुलच्या मदतीला राम आला आणि गणीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली... बुलडाण्यातल्या मेहकरच्या राम मगरचा अपघातात मृत्यू झाला. रामच्या आईनं त्यांच्या मुलाचे अवयव दान करण्याचे ठरवलं.. त्यानंतर रामची एक किडनी अब्दुल गणीच्या आयुष्यात धूत हॉस्पिटलच्या माध्यमातून आली.. डॉक्टरांनी अब्दुल गणीवर तातडीनं शस्त्रक्रिया करीत रामच्या किडनीचं प्रत्यारोपण केलं... रामच्या आईच्या दातृत्वानं थक्क झालेलं गणी कुटुंबीय आता त्यांची भेट घेऊन आभार मानणार आहेत..
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन अब्दुल गणी यांनी नवं जीवन दिलंय.. मात्र हे सारं श्रेय रामच्या आईचं असल्याचं डॉक्टरही अभिमानानं सांगतात...
जात धर्माच्या भिंती उभारुन दोन समाजात तेढ निर्माण्याचा प्रयत्न केला जातो.. मात्र या घटनेत जातीपातीच्या भिंती भेदून साक्षात रामनंच रहिमला जीवनदान दिल्यानं माणुसकीचा ख-या अर्थानं विजय झालाय..