मुंबई : आपल्या वक्त्यव्याचा विपर्यास केला गेला. आपण कोणत्याही जातीबद्दल बोललो नाही असा खुलासा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलाय. आरक्षण आणि मोर्च्याबाबत बडोले यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची एकच झोड उठली, त्यावर त्यांनी हा खुलासा केला.
'कोणीही उठतो, आंदोलन करतो आणि आरक्षण मागतो. आज काल पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होतात. आम्हीही आंदोलनं केली पण आम्ही मनातून बोलतो. कोपर्डीच्या घटनेचा आम्हीदेखील निषेधच करतो. पण आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे' असं बडोले यांनी म्हटलं होतं.