औरंगाबाद : सध्या कुणीही येऊन आरक्षण मोर्चे काढत असल्याची प्रतिक्रिया दिलीय खुद्द सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी...
'कोणीही उठतो... आंदोलन करतो आणि आरक्षण मागतो... आज काल पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होतात. आम्हीही आंदोलनं केली पण आम्ही मनातून बोलतोय. कोपर्डीच्या घटनेचा आम्हीदेखील निषेधच करतो. पण आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे' असंही बडोले यांनी म्हटलंय.
'कोपर्डीच्या नावाखाली वा अन्य कोणत्याही नावाखाली आमच्या अनुसूचित जातीजमातीच्या बांधववार अन्याय होणार असेल तर ते सहनकेले जाणार नाही अशा प्रसंगी मी राजीनामा देईल' असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आधीच सरकारच्या अडचणी वाढल्या असताना बडोलेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की...