टोलमध्ये पारदर्शकता हवी, तेव्हाच समाधानी- राज ठाकरे

राज्य सरकारानं टोलमाफीच्या घेतलेल्या निर्णयाने राज ठाकरेंचं समाधान झालेलं नाही. या अंशता टोल माफी ने आपण समाधानी नाही अशी प्रतिक्रिया, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिलीय. 

Updated: May 31, 2015, 10:55 PM IST
टोलमध्ये पारदर्शकता हवी, तेव्हाच समाधानी- राज ठाकरे title=

नाशिक : राज्य सरकारानं टोलमाफीच्या घेतलेल्या निर्णयाने राज ठाकरेंचं समाधान झालेलं नाही. या अंशता टोल माफी ने आपण समाधानी नाही अशी प्रतिक्रिया, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिलीय. 

मुख्य रस्त्यावरच्या, तसंच जास्त पैसे घेणाऱ्या टोलमध्ये जोपर्यंत पारदर्शकता येणार नाही, तोपर्यंत आपण समाधानी होणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. 

टोलमुक्ती हे मनसेनं केलेल्या आंदोनाचं फलीत असल्याचं सांगत, टोलमुक्तीचं श्रेय त्यांनी आपल्याकडे घेतलंय. मात्र टोल विषयी भरभरून बोलणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील दुष्काळाच्या प्रश्नावर बोलणं यावेळी टाळलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.