शत्रुशी मैत्रीकरून नाशिक राखता येईल का?

महापौरपदाच्या निवडीवरून जोरदार राजकीय घमासान सुरू झालंय. भाजपनं मनसेची साथ सोडल्यामुळं सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. मनसेपुढं सध्या तरी केवळ राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय आहे. मात्र भुजबळांवर जहरी टिका करून सत्तेवर आलेली मनसे सत्तेसाठी भुजबळांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated: Sep 10, 2014, 11:51 PM IST
शत्रुशी मैत्रीकरून नाशिक राखता येईल का? title=

नाशिक : महापौरपदाच्या निवडीवरून जोरदार राजकीय घमासान सुरू झालंय. भाजपनं मनसेची साथ सोडल्यामुळं सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. मनसेपुढं सध्या तरी केवळ राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय आहे. मात्र भुजबळांवर जहरी टिका करून सत्तेवर आलेली मनसे सत्तेसाठी भुजबळांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकच्या महापौर निवडीत पाठिंब्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीनंतर मात्र मनसेच्या नेत्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. नाशिकमध्ये असलेल्या एकमेव महापालिकेतील सत्ता टीकवण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करत आहे.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत मनसे मौन बाळगत असली तरी सत्ता टिकवायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय मनसेपुढे पर्याय नाही. भुजबळांवर जोरदार आरोप करत राज ठाकरेंनी नाशिकची सत्ता काबिज केली होती. 

मात्र आता त्यांच्याच गळ्यात गळा घालण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. त्यामुळं भुजबळांसोबत जायचं की नाही असा पेच राज ठाकरेंसमोर निर्माण झालाय. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले उपस्थित होते.  12 सप्टेंबरला नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.