राज ठाकरेंच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

राज ठाकरे यांनी आज अॅट्रॉसिटी कायद्यावर भाष्य केलं आहे, यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, राज ठाकरे यांनी नेमके कोणते महत्वाचे मुद्दे पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडले ते थोडक्यात

Updated: Jul 26, 2016, 12:14 AM IST
राज ठाकरेंच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे title=

पुणे : राज ठाकरे यांनी आज अॅट्रॉसिटी कायद्यावर भाष्य केलं आहे, यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, राज ठाकरे यांनी नेमके कोणते महत्वाचे मुद्दे पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडले ते थोडक्यात

राज ठाकरे म्हणाले....

शरिया नाही, तर शरियासारखा कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे
बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे कायदे हवेत
गुन्हा घडला यात जात कुठून आली? निवडणुकीसाठी जात हा विषय पोसला जातो आहे
मराठा आणि दलितच नाही, तर सर्वांचा केवळ जातीय वापर होतो आहे
अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणेची गरज
समाजप्रमाणे नाही, देशात एकच कायदा ठेवा
शिवाजी महाराजांची शिवशाही अवतरली पाहिजे, तरच या गोष्टी थांबतील
शरिया कायद्याप्रमाणे आरोपींना शिक्षा द्या
शरिया कायद्याप्रमाणे आरोपींना शिक्षा द्या