लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात लातूरमध्ये पाऊस पडला.
जोरदार वारे आणि विजांसह पावसाचं आगमन झालं. पावसाने अशीच हजेरी लावली तर शेतकरी पेरणीला सुरुवात करु शकणार आहेत. जळगावमध्येही काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
पावसामुळे शहरातल्या रस्त्यांची दैना झाली. ठिकठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं होतं. यामुळे महापालिकेच्या नालेसफाईचे दावे फोल असल्याचं दिसून आलं. आपल्या भागात असा पाऊस कधी बरसणार, याची प्रतिक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव आणि शहरातला नागरिक करतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.