वसई : वसई विरार पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा वचननामा बुधवारी शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत वसईत प्रसिद्ध करण्यात आला.
या वचननाम्यात पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, कर रचना, मैदाने-उद्याने-नाट्यगृह, जलतरण तलाव, वसईतील किल्ले व निसर्ग, परिवहन या मुद्यांवर आश्वासने देण्यात आलीत.
वसईमधील भ्रष्टाचार आणि वटहुकूमशाही मोडून काढून, विकास साधू असा विश्वास यावेळी सेना नेत्यांनी व्यक्त केला. भाजपाचे खासदार कपिल पाटील, शिवसेना नेते अनंत तरे आणि माजी आमदार हेमेंद्र मेहतादेखील यावेळी उपस्थित होते.
१४ जून रोजी होणा-या या महापालिका निवडणूकीत शिवसेना ७८ तर भाजप २१जागांवर लढणार आहे. तर रामदास आठवलेंच्या आरपीआयने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.