बुलडाणा जिल्ह्यातील दमदार पाऊस, पेरणीला सुरुवात

गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने यावर्षी कपाशी, तूर, उडिदाचा पेरा वाढणार असून सोयाबीनमध्ये काही प्रमाणात घट होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

Updated: Jun 16, 2015, 10:59 AM IST
बुलडाणा जिल्ह्यातील दमदार पाऊस, पेरणीला सुरुवात title=

बुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने यावर्षी कपाशी, तूर, उडिदाचा पेरा वाढणार असून सोयाबीनमध्ये काही प्रमाणात घट होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 
 
बुलडाणा जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद याची पेरणी केल्या जाते. २०१४ मध्ये पाउस उशिरा सुरु झाल्याने ४ लाख १२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती तर १ लाख ७५ हजार कपाशी लागवड करण्यात आली होती. 

यावर्षी १२, १३ जूनला पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावल्याने यावर्षी कपाशीची लागवड वाढणार असून २ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे तसेच ६७ हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता आहे. तर ३ लाख ४५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
 
जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमांवर बियाण्याचा आणि खताचा साठा उपलब्ध असून सोयाबीनची लागवड करतांना शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन पेरावे असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केले आहे. एकूणच वेळेवर पाउस आल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून यावर्षी चांगले पीकपाणी होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.