मनमाडजवळ मालगाडीचा डबा घसरला...

मनमाड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.

Updated: Apr 23, 2017, 10:49 PM IST
मनमाडजवळ मालगाडीचा डबा घसरला...  title=

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.

मनमाड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 5 वरून ही मालगाडी जात असताना इंजिनपासून 29 वा डबा रुळावरुन घसरला. महेंदीपूरच्या अन्न महामंडळ गोडाऊनमधून ही मालगाडी गहू जालन्याकडे घेऊन जात होती.

अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूकीवर परिणाम दिसून आला. या अपघातामुळे पुणे आणि औरंगाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आलीय. गेल्या 10 दिवसांत मनमाड रेल्वे स्थानकाजवळची ही दुसरी घटना आहे.