रायगडमधील सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅमवर जमावबंदी लावण्यात आली आहे. सोलनपाडा डॅमचा धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या धबधब्यावर येणारे पर्यटक परिसरात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

Updated: Jul 18, 2016, 01:33 PM IST
रायगडमधील सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी title=

रायगड : कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅमवर जमावबंदी लावण्यात आली आहे. सोलनपाडा डॅमचा धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या धबधब्यावर येणारे पर्यटक परिसरात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

आजूबाजूच्या झुडपात नको ते चाळे 

पर्यटक फार मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात. अनेक अल्पवयीन शाळा कॉलेज मधील मुले, मूली आणि पर्यटक अतिशय तोकड्या कपड्यात सभ्य पणाच्या सर्व मर्यादा ओलांडून डॅमच्या पाण्यात किंवा आजूबाजूच्या झुडपात नको ते चाळे करीत असतात, असा येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे.

ग्रामस्थानाच धमक्या

पर्यटकांमुळे या विभागातील लहान मुले आणि मुलींवर दुष्परिणाम होऊ नये, म्हणून सदर पर्यटकांना हटकले तर ते ग्रामस्थानाच धमक्या देतात. मद्यधुंद पर्यटक आपल्या रिकाम्या दारुच्या बाटल्या आजूबाजूच्या माळावर किंवा शेतात फेकून देतात, दर आठवड्याला हजारो रिकाम्या बाटल्या या परिसरात फोडून फेकल्या जातात. त्यामुळे माळ रानावर गुराख्यांना म्हशी चारणे देखील अवघड झाले असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

दारूच्या बाटल्यांच्या काचांचा खच

तसेच  शेतांमधे सर्वत्र पसरलेल्या या बाटल्यांमुळे शेतात कामे करणारे शेतकरी जखमी होत आहेत, या समस्येमुळे टेंभरे ग्रामपंचायत आणि मोग्रज ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या हद्दीत येणाऱ्या पर्यटकाना बंदी घालावी आणि असा ठराव करा. या प्रती त्याची प्रत बी डी ओ, आणि पोलिस निरीक्षक कर्जत याना द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत.

डॅमवर तिघांचा मृत्यू

दरम्यान सोलनपाडा धरणात काल सोलानपाडा डॅमवर तिघांचा मृत्यू झाला आहे. डॅमच्या पायऱ्यांवरील कठड्याला डोक अपटून एकाचा मृत्यू झालाय, तर दोन जण धरणात बुडाले आहेत.जोगेश्वरी येथील विनोद मथुराज रेड्डी, गोरेगावच्या अमित प्रकाश म्हात्रे या दोन जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.