पंढरीची संपूर्ण वारी पाहा... ऑनलाईन'!

पंढरीच्या वारीचं आता मोबाईलवर दर्शन घेता येणार आहे. देहू ते पंढरपूर वारीचं ऑनलाईन दर्शन आता भक्तांना घेता येईल. पालखी प्रमुखांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Jun 17, 2015, 11:50 PM IST
पंढरीची संपूर्ण वारी पाहा... ऑनलाईन'! title=

पंढरपूर : पंढरीच्या वारीचं आता मोबाईलवर दर्शन घेता येणार आहे. देहू ते पंढरपूर वारीचं ऑनलाईन दर्शन आता भक्तांना घेता येईल. पालखी प्रमुखांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, पंढरपूच्या विठूरायाचं दर्शनं घेण्यासाठी 'पास'ही तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतो. मंदिर समितीने वेबसाईट बनविली असून, त्याद्वारे यंदाच्या आषाढीपासून दर्शन घेता येणे शक्य आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं भाविकांसाठी दिलेल्या या सुविधेमुळे वारीला न जाताही भाविकांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. 

यासाठी www.vitthalrukminimandir.org ही वेबसाईट सुरू करण्यात आलीय. याद्वारे पददर्शन नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेणे शक्य झाले आहे. 

कामाच्या व्यापामुळे ज्यांना स्वत: पंढरपूरला जाणं शक्य नाही, अशा भाविकांना या सेवेचा लाभ घेता येईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.