पुण्यात सेक्स रॅकेटवर छापा, ३ मुलींसह दलाल अटकेत

पुण्यात सेक्स रॅकेट चालत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आहे.

Updated: Jul 21, 2016, 11:20 AM IST
पुण्यात सेक्स रॅकेटवर छापा, ३ मुलींसह दलाल अटकेत title=

पुणे: पुण्यात सेक्स रॅकेट चालत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आहे. यात ३ मुलींसह एका दलाला अटक करण्यात आली आहे.  कोथरुड भागातील भुसारी कॉलनीत हा छापा टाकण्यात आला. यात ३ मुलींसह दलाल रवी शिवाजी तपासे याला अटक कऱण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तीन मुली मुंबईच्या तर एक पुण्याची आहे

पुण्यातील वेश्या व्यवसायातील नामचीन दलाल कल्याणी देशपांडे हे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना होती. या महिलेवर एकदा मोक्का आणि  पुण्यातील विविध पोलिस स्टेशनमधे तिच्यावर २२ गुन्हे दाखल आहेत.