पुणे : पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' अर्थात 'एफटीआयआय'च्या आंदोलनाला राजकीय वळण लागलं असतानाच आज एका नव्या योद्ध्यानं या महाभारतात उडी घेतलीय.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी आज एफटीआयआयमध्ये संपकरी विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा मात्र विरोध आहे. त्यामुळे गजेंद्र चव्हाण यांच्यासह नियामक मंडळाच्या इतर सहा सदस्यांची नियुक्ती रद्द व्हावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
गेले ५० दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाला सरकारकडून मात्र प्रतिसाद नाही. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या बाजुनं तसेच विद्यार्थ्यांच्या विरोधात अशा दोन्ही बाजुंनी विविध राजकीय पक्ष तसेच संघटना ह्या आंदोलनात उतरल्या आहेत.
अशातच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आज विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी एफटीआयआयमध्ये येत आहेत. त्या ठिकाणी ते काय भूमिका मांडतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.