गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली

साईबाबांना गुरूस्थानी मानणाऱ्यांसाठी पर्वणीचा उत्सव म्हणजे शिर्डीतला गुरूपौर्णिमा उत्सव... तीन दिवस भक्तीभावात साजरा होणाऱ्या या उत्सवाला सुरूवात झालीय.

Updated: Jul 31, 2015, 09:19 AM IST
गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली title=

शिर्डी : साईबाबांना गुरूस्थानी मानणाऱ्यांसाठी पर्वणीचा उत्सव म्हणजे शिर्डीतला गुरूपौर्णिमा उत्सव... तीन दिवस भक्तीभावात साजरा होणाऱ्या या उत्सवाला सुरूवात झालीय.

गुरूपौर्णिेमेसाठी पायी चालत शिर्डी गाठणाऱ्यांची संख्या कमी नाही. शिर्डीत साजऱ्या होणाऱ्या मोठ्या तीन उत्सवांपैकी हा उत्सव... सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साईचरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाईपर्यंत नेण्यात आली.

द्वारकामाईत अखंड पारायणं करून गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली. उत्सवानिमित्त साईमंदिर आणि परीसर सुंदर फुलांनी सजविण्यात आलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.