अंधमित्र १४ वर्षांपासून दिवाळीला सीमेवर जवानांना भेटतात

दिवाळी निमित्तानं पुण्यातला मित्रांचा एक समूह सीमेवर जाणार आहे. विशेष म्हणजे मित्रांच्या या समूहातले बरेच जण दृष्टिहीन आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी प्रेमाने दिलेला फराळ आणि ग्रिटिंग्जही ते तिथे भारतीय सैन्याला सोपवणार आहेत. सोबतच सचिन, विराट, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मानं दिलेली क्रिकेट किटही ते जवानांना देणार आहेत. 

Updated: Oct 31, 2016, 05:42 PM IST
अंधमित्र १४ वर्षांपासून दिवाळीला सीमेवर जवानांना भेटतात title=

पुणे : दिवाळी निमित्तानं पुण्यातला मित्रांचा एक समूह सीमेवर जाणार आहे. विशेष म्हणजे मित्रांच्या या समूहातले बरेच जण दृष्टिहीन आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी प्रेमाने दिलेला फराळ आणि ग्रिटिंग्जही ते तिथे भारतीय सैन्याला सोपवणार आहेत. सोबतच सचिन, विराट, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मानं दिलेली क्रिकेट किटही ते जवानांना देणार आहेत. 

जवानांसोबत हे सारे जण क्रिकेटही खेळणार आहेत. यंदाचं या मित्रांचं भारतीय जवानांना दिवाळी निमित्तानं भेटण्याचं चौदावं वर्ष आहे. सारा देश भारतीय जवानांसोबत आहे हे सांगण्यासाठी या मित्रांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

पाहा व्हिडिओ