पुणे : चौकाच्या एका कोपऱ्यात वाहन चालकांशी हुज्जत घालणारे वाहतूक पोलीस, हे चित्र पुण्यात आता इतिहास जमा होणार आहे. कारण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवत आहेत. तर, दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन देण्यात आले आहेत. मागील चार दिवसात अशा प्रकारे सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५० वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
वाहन चालवताना मोबाईलवॉर बोलत आहात... आणि जवळपास वाहतूक पोलिसही नाही. तरीही तुमच्यावर कारवाई झाली तर... पुण्यात हे शक्य झालंय. कारण पुण्यात चौका चौकात बसवलेल्या सीसीटीव्ही मधून वाहन चालकांवर नजर ठेवली जात आहे. त्यातही मोबाईल वर बोलणाऱ्या वाहन चालकांवर विशेष लक्ष आहे. तीन दिवसात मोबाईल वर बोलणाऱ्या ५५० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे... कारवाई देखील फक्य दंडा पुरती मर्यादित नाही. तर, थेट लायसन्स सस्पेंड केलं जात आहे. आणि वॉर दोनशे रुपयांचा दंड देखील आकाराला जातोय.
वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवर देखील जोरदार कारवाई सुरु आहे. सिग्नल न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे असे वाहतुकीचे नियम मोडणारे सीसीटीची मध्ये कैद होत आहेत. त्यांना थेट त्यांच्या मोबाईलवर कारवाईचा एसएमएस जातो. सोबत वाहतूक नियम मोडताना काढलेल्या फोटोची लिंक देखील जाते. हि कारवाई एकीकडे चालू असताना, रस्त्यावर देखील वाहतूक पोलीस कारवाईची पावती फाडायला तयार आहेत. पण, वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ते रोख पैसे मागत नाहीत. तर, फक्त क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मधून इ चलन करतात. अशा प्रकारे मागील चार दिवसात सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
तीन दिवसात सहा हजार वाहन चालकांवर कारवाई... हा आकडा मोठा वाटत असला तरी हि तर फक्त सुरवात आहे. त्यामुळं ,आता पुण्यात वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे हिताचे ठरणार आहे. अन्यथा घरी पोहचेपर्यंत कारवाईचा एसएमएस तुमच्या मोबाईलवर आलेला असेल.