पुणे : वादात सापडलेल्या पुण्यातल्या सनबर्न पार्टीच्या त्यामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी सनबर्नच्या आयोजकांना 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश दिलेत एनओसी सादर केल्यानंतरच सनबर्न फेस्टीव्हलला परवानगी देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुसरीकडे पुण्याच्या सनबर्न पार्टीचा वाद हायकोर्टाच्या पायरीवर पोहोचला आहे. आयोजकांकडून 12 पैकी केवळ एकच NOC सादर करण्यात आलं आहे. उद्यापर्यंत NOC न दिल्यास पार्टी रद्द होण्याची चिन्हं आहेत. तर सनबर्नला सरकारनंच पायघड्या घातल्याचा शिवसेना खासदारांनी आरोप केला आहे.
केसनंद येथील ग्रामस्थ दत्तात्रय पासलकर यांनी याचिका दाखल केली आहे. आज आयोजक केवळ फायर ब्रिगेडची एनओसी सादर करू शकले. उद्या सकाळी अकरापर्यंत उर्वरित 11 एनओसी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.