पुण्याजवळ सुखोई विमान कोसळले

शिरुर येथे भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली आहे. या विमानाचा पायलट सुखरुप आहे.

Updated: Oct 14, 2014, 08:50 PM IST
पुण्याजवळ सुखोई विमान कोसळले title=

पुणे : वाघोलीजवळील कोलवडी येथे भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली आहे. या विमानाचा पायलट सुखरुप आहे.

कोलवडी गावाजवळच्या साळुंखे मळ्याजवळ हे सुखोई विमान कोसळले. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

पायलटनी बलूनच्या सहाय्याने विमानातून बाहेर उडी मारल्याने ते बचावलेत. या घटनेनंतर हवाई दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.