पुण्यात डांबून ठेवलेल्या १६ मुलींची सुटका

 शहरात बुधवारी मध्‍यरात्री शहर पोलिसांच्‍या सामाजिक सुरक्षा विभागाच्‍या पथकाने छापा टाकला. मंगळवार पेठेत असलेल्‍या रेल्‍वे स्‍थानकाजवळील वर्षा लॉजवर हा छापा टाकण्यात आला. वेश्‍याव्‍यवसायासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या, १६ मुलींची सुटका करण्‍यात आली. 

Updated: Dec 3, 2015, 06:25 PM IST
पुण्यात डांबून ठेवलेल्या १६ मुलींची सुटका title=

पुणे :  शहरात बुधवारी मध्‍यरात्री शहर पोलिसांच्‍या सामाजिक सुरक्षा विभागाच्‍या पथकाने छापा टाकला. मंगळवार पेठेत असलेल्‍या रेल्‍वे स्‍थानकाजवळील वर्षा लॉजवर हा छापा टाकण्यात आला. वेश्‍याव्‍यवसायासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या, १६ मुलींची सुटका करण्‍यात आली. 

दरम्‍यान, ८ लाख २५ हजार रुपयेही जप्‍त करण्‍यात आले. पोलिसांनी लॉजचा व्‍यवस्‍थापक, ८ ग्राहक आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्‍यात घेतले . दरम्‍यान, मुक्‍त करण्‍यात आलेल्‍या युवतींची देखील चौकशी सुरू आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जरग यांच्‍या नेतृत्‍वात एका पथकात छापा टाकला. एका व्‍यक्‍तीने फोन करून या बाबत शहर पोलिसांना ही माहिती दिली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.