पुण्यात ओवेसींच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी

 पुण्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींची यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2017, 07:12 PM IST
पुण्यात ओवेसींच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी  title=

पुणे : पुण्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींची यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. असदुद्दीन ओवेसींची सभा उद्या ५ वाजता टिंबर मार्केटमध्ये सभा होणार आहे.एमआयएमनं दिलेल्या जागेच्या प्रस्तावाला पोलिसांनी मान्यता दिली आहे. प्रभाग क्र. 19 मधील एमआयएम उमेदवार जुबैर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

आज एमआयएम कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांची भेट घेतली आणि टींबर मार्केटमधील जागेचा प्रस्ताव दिला. यापूर्वी रस्त्यावर एमआयएमनं सभेची परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात आली होती.

पोलिसांनी यापूर्वी सभेला नकार दिला, याचं कारणही पोलिसांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं होते, पुणे पोलिसांनी म्हटलं होतं,  एमआयएमनं सुरुवातीला सभेसाठी ज्या जागेची मागणी केली होती, ते ठिकाण अत्यंत संवेदनशील असल्यानं पोलिसांनी तेथील सभेला परवानगी नाकारली होती. तिथं कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, या आधी परवानगी नाकारली होती.