पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भर चौकात पॉर्न फिल्म सुरु झाल्याची जोरदार चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा पुणे आणि तंत्रज्ञानामध्ये बिनसलं आहे. पुण्यातल्या बसचं वेळापत्रक दाखवणाऱ्या स्क्रिनवर स्वारगेटऐवजी स्वर्गात असं लिहिण्यात आल्याचा फोटो व्हायरल होतं आहे.
या स्क्रिनवर अपेक्षित वेळ सहा मिनिटं लिहिण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंगवर सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, पण हा फोटो खरा आहे का मॉर्फ करण्यात आला आहे, याबाबत मात्र कोणतीही माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही.