नागपूर महानगरपालिकेची बँक खाती गोठवली

महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आलीय. 

Updated: Nov 4, 2016, 07:12 PM IST
नागपूर महानगरपालिकेची बँक खाती गोठवली title=

नागपूर : महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आलीय. 

2011 ते 2013 या दोन वर्षांच्या कालावधीत पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनाचा पीएफ जमा करण्यात आलेला नाही.  त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागानं पालिकेवर ही कारवाई केलीय. 

भविष्य निर्वाह निधी विभागाने महापालिकेच्या बँक ऑफ महाराष्ट्रची खाती गोठवली आहेत.बँक खाती गोठविल्याने महापालिकेला बँक खात्यातून कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही यामुळे महापालिका प्रशासनापुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

एलबीटी कर रद्द केल्यावर महापालिकेला राज्य सरकारकडून अपेक्षित अनुदान प्राप्त न झाल्याने महापालिकेवर आर्थिक भार बसला. ज्यामुळे हा पीएफ चा निधी जमा न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.