पीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप

एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: Sep 12, 2016, 02:55 PM IST
पीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप title=

वाशिम : एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 या हत्येमागे पीएसआय तुकाराम ढोकेंचा हात असल्याचं समोर येत आहे. वाशिममधल्या मानोरा भागात २ महिन्यांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.

 मंगरुळपीरमधील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या ढोकेंच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच प्रेमापोटी दोघांनी घरातून पळ काढला होता.त्या रागातून ढोकेंनी ही हत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकही केली गेली आहे. 22 ते 25 वर्ष वयोगटातील मृत तरुण अमरावतीचा रहिवासी होता.