नोटबंदीमुळे पोलिसांना 300 कोटींवर पाणी सोडावं लागणार?

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या निर्णयाचा फटका पोलीस दलालाही बसणार आहे.

Updated: Nov 24, 2016, 07:47 PM IST
नोटबंदीमुळे पोलिसांना 300 कोटींवर पाणी सोडावं लागणार?  title=

ठाणे : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या निर्णयाचा फटका पोलीस दलालाही बसणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाईत जप्त केलेल्या तब्ब्ल तीनशे कोटीच्या ५०० आणि १०००च्या नोटांची रद्दी होणार आहे.

ही रक्कम 300 कोटींच्या घरात आहे. या नोटा बदलवण्यासाठी ५० दिवसांचा अवधी आहे. मात्र जप्त केलेल्या नोटा न्यायालयात पुरावा म्हणून सादर कराव्या लागत असल्याने त्या बदलणं शक्य होत नाहीये. त्यामुळे पोलिसांची मोठी अडचण झालीये. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक तोडगा काढेल, अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.