पिंपरीत निष्ठावंताना डावलून आयारामांना भाजपची ९० टक्के उमेदवारी

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाली आणि अपेक्षेप्रमाणेच कित्येक वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी निष्ठेनं काम करणा-या कार्यकर्त्यांचा बळी दिला गेल्याचं उघड झालं. यादीत तब्ब्ल ९० टक्के उमेदवार राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांतून आयात केलेले आहेत. त्यामुळं पार्टी विथ डिफरन्स असलेली भाजप पार्टी विथ भ्रष्ट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Feb 5, 2017, 12:02 AM IST
पिंपरीत निष्ठावंताना डावलून आयारामांना भाजपची ९० टक्के उमेदवारी   title=

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाली आणि अपेक्षेप्रमाणेच कित्येक वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी निष्ठेनं काम करणा-या कार्यकर्त्यांचा बळी दिला गेल्याचं उघड झालं. यादीत तब्ब्ल ९० टक्के उमेदवार राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांतून आयात केलेले आहेत. त्यामुळं पार्टी विथ डिफरन्स असलेली भाजप पार्टी विथ भ्रष्ट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

हे आहेत अमोल थोरात. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे गेली कित्येक वर्षं निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी त्यांच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा दिमाखात फडकत होता. आज तिथं निषेधाचे काळे झेंडे लागलेत. अमोल थोरात यांचं तिकीट ऐन वेळी राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवारासाठी कापण्यात आलं. संघ आणि आरएसएसचे निष्ठावान कार्यकर्ते एवढीच त्यांची ओळख नाही. तर अमोल थोरात यांचे वडील विनायक थोरात हे संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह आहेत. 

पैसे घेऊन तिकीट वाटल्याची कुजबुज सुरु असल्याच सांगत अमोल थोरात यांनी अप्रत्यक्षपणे अमर साबळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. या संदर्भात थोरात यांनी थेट प्रदेशाध्यक्ष दानवेंनाच पत्र पाठवलंय. एकटे अमोल थोरातच नाहीत तर शहरातले भाजपचे अनेक निष्ठावान पदाधिकारी आणि संघाचे निष्ठावान कार्यकर्तेही नाराज आहेत. या सर्व घडामोडींसंबंधी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि अमर साबळे या दोघांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.