अतिरिक्त आयुक्तांवरच दरोड्याचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्याविरोधात सातारा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Dec 9, 2014, 07:14 PM IST
अतिरिक्त आयुक्तांवरच दरोड्याचा गुन्हा दाखल title=

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्याविरोधात सातारा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा पोलीस ठाण्यात तानाजी शिंदे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तानाजी शिंदे, त्यांचा मुलगा अनिकेत यांच्यासह अन्य पाच अनोखळी गुंडांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरोड्या बरोबरच शिंदे यांच्यावर बेकायदा जमाव जमवणे, धमकी देणे, नुकसान करणे, दंगल माजवणे असे आरोप लावण्यात आले आहेत. 

तानाजी शिंदे यांनी पिंपरी - चिंचवड महापालिकेची पिवळ्या दिव्याच्या गाडीचा नियम डावलून वापर केला. हे वृत्त 'झी २४ तास'ने सर्वप्रथम दिले होते. महापालिका हद्दीबाहेर थेट सातारा जिल्ह्यात शिंदे यांनी महापालिकेची गाडी नेली होती. या गाडीला पिवळा दिवा होता. या गाडीतून शिंदे यांनी गुंड आणून जमिनीच्या वादात शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. 

मात्र, एवढं होऊनही पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्यांनतर 'झी २४ तास'ने हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर खडबडून जागे झालेल्या सातारा पोलिसांनी अखेर सोमवारी ८ डिसेंबरला शिंदे यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.