माणूस माणुसकी विसरला का ?

सेल्फी काढण्याच्या नादात माणूस माणुसकी विसरला आहे का ? हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे बुलडाण्यात घडलेली घटना. 

Updated: Feb 26, 2016, 12:36 PM IST
माणूस माणुसकी विसरला का ? title=

बुलडाणा: सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात माणूस माणुसकी विसरला आहे का ? हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे बुलडाण्यात घडलेली घटना. 

मलकापूर बुलढाणा रोडवर वसंत ढोले यांना ट्रॅक्टरनं जोरदार धडक दिली. त्याच्या शरीरातून मोठा रक्तस्त्राव होत होता. ढोले यांना मदतीची गरज असताना कुणीही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची तसदी घेतली नाही. 

बघ्यांची गर्दी केवळ हा अपघात आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवण्यात दंग होते. वेळीच ढोले यांना मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचलेही असते.