पनवेल : पनवेल जवळ रविवारी पहाटे झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी निखिल ट्रॅव्हल्सच्या बसचा मृत्यू पावलेला चालक इकबाल शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय.
शेडुंग हद्दीजवळ रविवारी पहाटे साडेपाच वाजता ही खाजगी बस दोन गाड्यांवर आदळून एका 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात 17 जणांचा बळी गेला. शिवाय 45 जण जखमी झाले.
सतरा जणांमध्ये बसच्या चालकाचाही समावेश आहे. दरम्यान अपघाताच्यावेळी रस्त्यात उभ्या पंक्चर झालेल्या गाडीच्या नंबरबद्दल निर्माण झालेला संशय दूर झालाय.
MH 02 CL 1480 हा खरा नंबर असल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय. अपघाताच्या वेळी गाडीच्या मागच्या आणि पुढच्या नंबर प्लेटमध्ये तफावत होती. त्यामुळे गाडी चोरीची आहे की काय असा संशय व्यक्त होत होता. पण आता हा संशय दूर झालाय.