राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी वारे वाहू लागलेत. सोसाट्याच्या वा-यामुळे मोठी झाडं उन्मळून पडलीत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या दोन जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता दहावर गेलाय. परभणीत दोन ठिकाणी वीज पडून 2 ठार 2 जखमी झालेत. सेलू तालुक्यातील नरसापुर येथे एक जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजले आहेत. जिंतूर तालुक्यातील गीते पींपरी येथे 38 वर्षीय सूर्यभान मस्केवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

Updated: Jun 6, 2016, 10:16 AM IST
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस title=

मुंबई : हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी वारे वाहू लागलेत. सोसाट्याच्या वा-यामुळे मोठी झाडं उन्मळून पडलीत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या दोन जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता दहावर गेलाय. परभणीत दोन ठिकाणी वीज पडून 2 ठार 2 जखमी झालेत. सेलू तालुक्यातील नरसापुर येथे एक जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजले आहेत. जिंतूर तालुक्यातील गीते पींपरी येथे 38 वर्षीय सूर्यभान मस्केवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय.
 
दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. परवा रात्रीपासून जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरू आहे. कालही जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडला. अहमदपूर तालुक्यातल्या हडोळती-किनगाव परिसराला पावसानं झोडपून काढलं. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले, झाडं उन्मळून पडले, विजेचे 15 खांबही पडले. एक वाहनही पलटलं. तर बाबळदरमध्ये विजेचा खआंब अंगावर पडून अमृत भूजंग कांबळे या 65 वर्षिय वृद्धाचा मृत्यू झाला.
 
जालन्यात बहुतांश भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वा-यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घरावरील टिनपत्रे उडून गेलेत तर काही ठिकाणी भिंतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.