पानसरे हत्या : 14 वर्षांच्या मुलानं आरोपी समीर गायकवाडला ओळखलं

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ओळख परेड झालीय. यावेळी, एका 14 वर्षांच्या मुलानं समीरला ओळखलंय. 

Updated: Oct 8, 2015, 01:20 PM IST
पानसरे हत्या : 14 वर्षांच्या मुलानं आरोपी समीर गायकवाडला ओळखलं title=

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ओळख परेड झालीय. यावेळी, एका 14 वर्षांच्या मुलानं समीरला ओळखलंय. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका 14 वर्षांच्या मुलानं समीरची ओळख पटल्याचं सांगितलंय. परंतु, पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, त्यांची मोलकरीण आणि शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं मात्र समीरला ओळखलेले नाही. 

आज सायंकाळी समीर गायकवाडच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपतेय. त्यामुळे त्याला उद्या (9 ऑक्टोबर) पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. याआधी त्याची ओळख परेड होणं अपेक्षित होतं. त्यानुसार, तहसीलदार योगेश खरमाटे यांच्यासमोर ही ओळख परेड पार पडली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.