पालघर जि.प. निवडणुकीत भाजपला २१ तर शिवसेनेला १४ जागा

नव्यानं निर्माण झालेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला. भाजपने बाजी मारत २१ जागा पटकावल्या. तर शिवसेनेला १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Updated: Jan 30, 2015, 05:19 PM IST
पालघर जि.प. निवडणुकीत भाजपला २१ तर शिवसेनेला १४ जागा title=

पालघर : नव्यानं निर्माण झालेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला. भाजपने बाजी मारत २१ जागा पटकावल्या. तर शिवसेनेला १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागा आणि त्याचबरोबर पालघर, वसई, डहाणू, जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, विक्रमगड या आठ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली होती आज निकाल जाहीर झाला.

१० बहुजन विकास आघाडी, ४ जागा राष्ट्रवादीला, सीपीएमला ५ जागा मिळाल्यात. शिवसेना, भाजपनं ही निवडणूक स्वतंत्र लढवली होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मात्र ही निवडणुक एकत्रितपणे लढवली होती. त्याचा त्यांना फायदा झालेला नाही. काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली. बहुजन बहुजन विकास आघाडीला थोडे फार यश मिळाले. आपण भाजपसोबत असल्याचे बविआने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.