मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना एसटी बसचे आगाऊ आरक्षण सहज उपलब्ध व्हावं या दृष्टीनं इतर शासकीय सेवांप्रमाणे `महा ई-सेवा' केंद्रातून एसटी तिकीटाची आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
याचा फायदा महाराष्ट्रातील सुमारे 40 हजार ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला होईल. तसंच ज्या प्रवाशांना थेट इंटरनेटव्दारे एसटी प्रवासाचं तिकीट आरक्षित करायचं असल्यास त्यांनी रा.प.महामंडळाच्या www.public.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच www.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या प्रवासाचा मार्ग, एसटी बसेसच्या वेगवेगळया श्रेणीचे भाडे जाणून घेऊन प्रत्यक्ष तिकीट आरक्षण करता येऊ शकेल.