कोकण रेल्वेत निकृष्ट भोजन, कंत्राटदाराला लाखाचा दंड

निकृष्ट भोजन दिल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर कोकण रेल्वेने कॅटरींग कंत्राटादाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Updated: Sep 4, 2014, 02:37 PM IST
कोकण रेल्वेत निकृष्ट भोजन, कंत्राटदाराला लाखाचा दंड title=

मुंबई : निकृष्ट भोजन दिल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर कोकण रेल्वेने कॅटरींग कंत्राटादाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांमध्ये कॅटरींगची व्यवस्था असते. मात्र, अनेकवेळा निकृष्ट भोजन देण्यात येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्याकडे अनेकवेळा कॅटरींग कंत्राटदाराने दुर्लक्ष केले होते. अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने आलेल्या तक्रारींची दखल घेतली. निकृष्ट भोजन दिल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराला ठोठवण्यात आला.

आणखी काही प्रवाशांच्या भोजनाबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी ९००४४७०७०० या मोबाईल क्रमांकावर एसएमएस करुन पाठवू शकता. आपल्या तक्रारांची दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे कोकण रेल्वेच्या मुख्यजनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.