एक भाऊ सेनेचा तर दुसरा काँग्रेसचा नगरसेवक

नाशिक महापालिकेत यंदा भाजपने चांगले यश मिळवले. नाशिक महापालिका निवडणुकीत अनेक  उमेदवारांच्या निकालाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होत. 

Updated: Feb 25, 2017, 07:52 PM IST
एक भाऊ सेनेचा तर दुसरा काँग्रेसचा नगरसेवक title=

नाशिक : नाशिक महापालिकेत यंदा भाजपने चांगले यश मिळवले. नाशिक महापालिका निवडणुकीत अनेक  उमेदवारांच्या निकालाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होत. 

त्यातलीच दोन नावं म्हणजे राहुल दिवे आणि प्रशांत दिवे. माजी महापौर अशोक दिवे यांचे हे दोघे चिरंजीव आहेत. राहुल दिवे यांनी प्रभाग क्र १६ मधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

तर प्रशांत दिवे यांनी प्रभाग क्र १७ मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या दोघा भावांनी जरी वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली असली तरी दोघंही या निवडणुकीत विजयी झालेत.