ठाणे : शहरात वारंवार रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता, त्यांच्यावर सरळ नायायालयात खटला दाखल करणार आहोत, अशी माहिती पालवे यांनी दिली, अशी कारवाई मुंबई आणि ठाण्याच्या धरतीवर पहिल्यांदा होणार आहे .
काही वाहन धारक रस्त्यावर गाड्या पार्किंग करतात आणि त्यानंतर वाहतूक पोलीस त्या वाहनांना नियमानुसार जॅमर लावतात. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना जॅमर लावणे हे वाहतूक पोलिसांना बंधनकारकच आहे.
मात्र त्यामुळे वाहनधारक जॅमर लावल्याचा फायदा उचलतात आणि आपले वाहन सुरक्षित पार्क करून घेतात. अशा वाहनधारकांविरोधात तक्रारी वाढल्या असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली.