नोटबंदी : संयमाचा उद्रेक झाला तर महागात पडेल : पवार

नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा जनतेने स्वागत केले. मात्र, ग्रामीण  भागात अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे. आज लोकांचा संयम आहे, पण या संयमाचा उद्गेक झाला तर महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

Updated: Dec 7, 2016, 07:14 PM IST
नोटबंदी : संयमाचा उद्रेक झाला तर महागात पडेल : पवार title=
सौजन्य - NCP फेसबुक पेज

नागपूर : नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा जनतेने स्वागत केले. मात्र, ग्रामीण  भागात अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे. आज लोकांचा संयम आहे, पण या संयमाचा उद्गेक झाला तर महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा जनतेने स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेवर काय मोहीनी घातली आहे समजत नाही. काळा पैसा बाहेर येईल ते ठिक आहे. पण ग्रामीण भागात लोकाचा उद्योगधंदा बुडतो तरी म्हणत आहेत, देशासाठी अजून सहन करतोय. नव्या नोटा शहराला जास्त मिळतात आणि ग्रामीण भागाला कमी दिल्या जातात, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

जिल्हा सरकारी बॅंक अडचणीत

आरबीआयलाही सूचना आहेत शहरी भागातील वर्गाला नाराज नाही करायचे म्हणून तिथे जास्त नोटा दिल्या जातात. जिल्हा बॅंकांना सुरुवातीला ३ दिवस व्यवहार केले आणि बॅंकेत पैसे जमा झाले. ते पैसे कोणाचे त्याची चौकशी करा, कोण चुकलेले असेल तर कारवाई करा. पण ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या जिल्हा बॅंकांवर निर्बंध घातल्यामुळे वाईट परिणाम होत आहेत.

बॅंकिंग परवाना असून ही बंदी कशाला, जमा झालेला कॅश आरबीआय घ्यायला तयार नाही. या बॅंका अडचणीत आल्या तर आपल्या पैशांचे काय होणार, अशी चिंता ग्रामीण भागातील जनतेला  आहे. ग्रामीण भागात पतसंस्थामध्ये मोठ्या प्रमाणावर खाती आहेत. त्यांच्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत, असे का असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

शेतकरी अडचणीत, व्यापाऱ्यांकडून लूट

व्यापारी शेतक-यांना लुबाडत आहेत. जुन्या नोटा देऊन माल खरेदी केला जात आहे. यावेळी दिल्या जाणाऱ्या पावतींवर व्यापाऱ्यांचे नाव नसते. आज सोयाबीनचे पिक चांगले असताना त्याला व्यापारी भाव पाडून देत आहेत. विदर्भातील संत्र्यांला या निर्णयापूर्वी काय भाव होता आणि आता काय भाव आहे हे तपासा. कांदा, टोमॅटो सगळ्या पिकाचे भाव कोसळले अहेत. आज लोकांचा संयम आहे, पण या संयमाचा उद्गेक झाला तर महागात पडेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन आपली ताकद वापरावी आणि राज्यातील हे प्रश्न मांडावे. मुख्यमंत्र्यांनी वजन वापरून केंद्राकडून जादा नव्या नोटांचे चलन मिळवावे, अशी मागणी पवार यांनी केली.