पुणे : काही दुरुस्तीच्या कामामुळे पुणे शहर आणि परिसरातील उद्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशिरा कमीदाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी (वारजे) जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत आणि पंपिंगविषयक तसेच स्थापत्य विषयक देखभाल -दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व भागांचा उद्या गुरुवारी संपूर्ण दिवसभरासाठी बंद राहणार आहे.
पुणे शहरातील सगळ्या पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारारस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोन, मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खूर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रुंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरु गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगावरस्ता
लष्कर भाग, पुणे रेल्वेस्थानक, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूररस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता