चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे, यात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'नो व्हेकल्स डे' पार पाडण्याचा निर्णय चंद्रपुरकरांनी सर्वानुमते घेतला आहे. शहरातील डॉक्टर मंडळींनी देखील याला साथ दिली आहे.
चंद्रपूर शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या दिवशी कार्यालय गाठण्यासाठी चंद्रपूरकर पायी जाणार आहेत, अथवा सायकलीची मदत घेणार आहेत.
येत्या सोमवारपासून या उपक्रमाला सुरूवात होणार आहे, चंद्रपूर हे राज्यातील सर्वाधिक प्रदुषण असणाऱ्या शहरांमध्ये आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी आयोजित या वाहन विरहित दिवसाला सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.