जळगाव : प्रेमप्रकरणात आत्तापर्यंत आपण तरुण-तरुणी पळून गेल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. पण सासू आणि जावई पळून गेल्याची घटना तुम्ही पहिल्यादाच ऐकत असाल.
सासू ही जावयासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. मोठ्या मुलीच्या लग्नाला ५ महिने झाले होते. मुलगी माहेरी आली पण मुलीला नातेवाईकांकडे पाठवून सासूने पळ काढला. पतीने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पण जावई हा सुद्धा त्याच दिवसापासून गायब होता.
सासू आणि जावई एकाच दिवशी गायब झाल्याने दोघेही एकत्र असू शकतात असा अंदाज नातेवाईकांना होता. अखेर ८ दिवसानंतर पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी यांना शोधून काढले. नातेवाईकांनी समजवल्यानंतरही सासू ही आपल्या घरी जाण्यास तयार नव्हती तर मुलीनेही आपल्या पतीला न स्विकारण्याचा निर्णय घेतला. पतीने मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला असा आरोपही मुलीने तिच्या पतीवर केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.