मेंदूत घुसला खिळा मृत्यूच्या दाढेतून परत...!

एका साईटवर दोन तरुण काम करत असतात, अचानक एका तरुणाच्या मेंदूत दुसऱ्या तरुणाच्या हातातील प्रेशर मशीन द्वारे अगदी खोलवर खिळा घुसतो....मृत्यूच्या दाढेत गेलेला तो परत येतो... कसा,  पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....!

Updated: Aug 12, 2016, 07:50 PM IST
मेंदूत घुसला खिळा मृत्यूच्या दाढेतून परत...! title=

कैलास पुरी झी मिडिया पिंपरी चिंचवड : एका साईटवर दोन तरुण काम करत असतात, अचानक एका तरुणाच्या मेंदूत दुसऱ्या तरुणाच्या हातातील प्रेशर मशीन द्वारे अगदी खोलवर खिळा घुसतो....मृत्यूच्या दाढेत गेलेला तो परत येतो... कसा,  पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....!

तुम्ही ऐकताहेत ते खरं आहे... सिटी स्कॅन मध्ये मेंदूत खोलवर दिसणारा हा खिळा नितीन विश्वकर्मा या तरुणाच्या मेंदूत घुसला होता.. पुण्याच्या तळेगाव दाभाडे इथं एका साईट वर नितीन आणि त्याचा सहकारी काम करत असताना, अनवधानान सहकाऱ्याच्या हातातील प्रेशर मशिणीतून नितीन यांच्या डोक्याजवळ गेली आणि मशीनला असलेला खिळा थेट मेंदूत अगदी खोलवर घुसला... त्यानंतर नितीन जागीच बेशुद्ध पडले. 

नितीन यांना पिंपरी चिंचवडच्या स्टार रुग्णालयात हलविण्यात आलं.  नितीनची  प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यामुळं रुग्णालय प्रशासनासमोर नितीनवर शस्त्रक्रिया करण्याच एक मोठं आव्हान उभं होतं. शस्त्रक्रिया करताना मेंदूतील एका ही नसेला थोडा देखील धक्का लागला तर नितीनचा जीव धोक्यात जाण्याची चिन्ह होती. मात्र रुग्णालयाच्या टीमन हा धोका पत्कारत नितीनच्या मेंदूतून खिळा बाहेर काढून त्यांना जीवदान दिलं.

मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या नितीनला हा पुनर्जन्म मिळालाय अशी भावना तो व्यक्त करतोय...!

नितीन यांना पुनर्जन्म मिळालेला असला तरी मेंदूत घुसलेला खिळा हा गंजलेला असल्यानं, भविष्यात इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलीय. त्यामुळं नितीनला या जीवदानाचा आनंद घेताना मेंदूतील वेदनांकडे कटाक्षान लक्ष द्यावं लागणार आहे. हे जरी खरं असल तरी त्याला पुनर्जन्म मिळालाय हे ही तितकंच खर...!